निवडणुकीची रणधुमाळी लवकरच, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांवर लोकसभेला कुणाची आघाडी, मविआ की महायुती?
वर्षा गायकवाड यांना 445545 मतं मिळाली तर अॅड. उज्वल निकम यांना 429031 मतं मिळाली. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आमदार आहेत. चांदिवली, कुर्ला येथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. कलिना मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर काँग्रेसची साथ सोडलेले झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेला कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणी आघाडी घेतली आणि किती मतं मिळाली होती? वर्षा गायकवाड यांना चार मतदारसंघात आघाडी मिळाली. तर अॅड. उज्वल निकम यांना दोन मतदारसंघात आघाडी मिळाली.
चांदिवलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दिलीप लांडे आमदार आहेत. इथं वर्षा गायकवाड यांना102985 मतं मिळाली. तर, निकम यांना 98661 मतं मिळाली होती.
कुर्ला विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आमदार असून इथून वर्षा गायकवाड यांना 82117 मतं मिळाली होती. निकम यांना इथं 58533 मतं मिळाली.
कलिना मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय पोतनीस आमदार असून इथं वर्षा गायकवाड आघाडीवर होत्या. त्यांना 67620 मतं मिळाली. तर, निकम यांना 51328 मतं मिळाली.
झिशान सिद्दीकी आमदार असलेल्या आणि ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातही निकम पिछाडीवर होते. इथं गायकवाड यांना 75013 मतं मिळाली होती.अॅड.उज्वल निकम यांना 47551 मतं मिळाली.
निकम यांना पराग अळवणी आमदार असलेल्या विलेपार्ले मतदारसंघात 98341 मतं मिळाली. या मतदारसंघात निकम यांना सर्वाधिक आघाडी मिळाली.
आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात अॅड. उज्वल निकम यांना आघाडी मिळाली. 72593 मतं मिळाली होती. लोकसभेच्या निकालाचा विधानसभा निहाय विचार केला असता सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड आघाडीवर होत्या. तर, महायुतीचे अॅड.उज्वल निकम 2 मतदारसंघात आघाडीवर होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार हे पाहावं लागेल.