कोकणात ठाकरे गटाला धक्कातंत्र सुरूच! दापोलीतील खालीद रखांगेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदे सेनेत प्रवेश

मागील काही दिवसांपासून शिंदेंच्या सेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाकरेंच्या सेनेतले माजी आमदार पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेने सोबत जात आहेत.

आता पक्षातले हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून विशेष रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, असे असले तरी कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाला धक्कातंत्र सुरूच असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खालीद रखांगे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची भेट घेत रखांगे यांनी शिंदेच्या गटात पक्षप्रवेश केला आहे.
यापूर्वी ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून शिंदे यांच्या शिवसेना पाठिंबा दिला होता. या पाच नगरसेवकांनी योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला होता.
त्यानंतर आठवडाभरातच दापोलीमध्ये ठाकरे गटाला हा सलग दुसरा धक्का असल्याचे बोलले जात आहे.