महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि प्रशासनासोबत बैठका घेत महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी 3 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ ज्यांची सेवा झाली अशा अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा, असे आदेश दिले आहेत. शिवाय महाराष्ट्रात किती मतदार आहेत? याबाबत भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत.
राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री 4.64 कोटी आहेत.
राज्यातील तृतीयपंथीय मतदारांची संख्या 5997 इतकी आहे, तर दिव्यांग मतदार 6.32 लाख आहेत.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे.
राज्यांत महिला मतदारांमध्ये 10.77 लाखांची वाढ झाली आहे.
राज्यांत एकूण पोलिंग स्टेशनची संख्या 1 लाख 186 इतकी आहे.
शहरातील पोलिंग स्टेशनची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण - 57 हजार 601 इतकी आहे.
सर्वात कमी मतदान कुलाबा, कल्याण, कुर्ला, मुंबादेवी या भागात झालं तर गडचिरोली येथे 73 टक्के मतदान झालं.
शहरी भागात कमी मतदान झाल्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी चिंता व्यक्त केली.