Dhananjay Munde: एक डोळा अर्धोन्मिलित, डोळ्यांवर गॉगलची झापडं, मीडियाने प्रश्न विचारताच धनंजय मुंडे अडखळत म्हणाले....
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये वाल्मिक कराड गँगने संतोष देशमुख यांना कशाप्रकारे हालहाल करुन मारले, याचा तपशील समोर आला आहे. क्रौर्याची परिसीमा गाठणारे हे फोटो पाहून राज्यभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांना बेल पाल्सी या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या आजारामुळे धनंजय मुंडे सलग बोलण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय, त्यांच्या डोळ्यांवरही परिणाम झाला आहे.
धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी डोळ्यांवर गॉगल लावून वावरत आहेत. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रसारमाध्यमांनी धनंजय मुंडे यांना गाठले तेव्हा 'मला बोलता येत नाही, बेल्स पाल्सी आजार झाला आहे', असे ते अडखळत म्हणाले.
धनंजय मुंडे हे काल अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात आणि सभागृहाबाहेर गॉगल लावून फिरत होते. काही पत्रकारांपुढे त्यांनी गॉगल काढला. त्यांचा एक डोळा बंद अवस्थेत होता.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.
हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिल्यास ते काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वारंवार मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी होऊनही धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरून दुर झाले नव्हते. अजित पवार यांनीही त्यांना अभय दिले होते.
मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळून सरकारची प्रतिमा मलिन होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.
हे धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठे संकट मानले जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे धागेदोरे आता धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचणार का, हे आगामी काळात पाहावे लागेल.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता.
अनेक दिवस आरोप होऊनही धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकांना उपस्थित राहत होते.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यास पुढे त्यांची काय भूमिका असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.