PHOTO : अजित पवार यांच्याकडून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचं सांत्वन
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतर अजित पवारांनी लक्ष्मण जगताप यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.
लक्ष्मण जगताप हे पहिल्यांदा आमदार कसे बनले याचा किस्सा अजित पवारांनी सांगितला.
अजित पवार म्हणाले, विधानपरिषदेच्या 2004 च्या निवडणुकीवेळी मी लक्ष्मण जगताप यांना सांगितलं होतं, तू अपक्ष उभा राहा. मी सांगेपर्यंत मोबाईल स्विच ऑन करु नको. वरिष्ठांचा दबाव होता. कारण त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार समोर उभे होते. तरीही मीच त्यांना उभं केलं आणि ते अपक्ष म्हणून अधिक मताधिक्याने निवडून आले
अजित पवारांनी लक्ष्मण जगताप यांच्या घरी पोहोचले त्यावेळी लक्ष्मण जगतापांचे लहान भाऊ शंकर जगताप हे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या बाजूला बसले होते.
मात्र लक्ष्मण जगतापांचे मोठे बंधू विजय जगताप तिथे नव्हते. हे पाहून अजित पवारांनी त्यांनाही बोलावून घेतलं.
मग एकामागोमाग एक घरातील सर्व मुला-मुलींना बोलावून घेतलं. ते आता काय करत आहेत. शिक्षण घेत असतील तर कोणतं घेत आहेत? व्यवसायात असतील तर तो कसा करतायेत? संसारात असतील तर तो कसा सुरु आहे. याबाबत इत्यंभूत माहिती घेतली आणि वडिलकीच्या नात्याने त्यांना मोलाचा सल्ला दिला.
त्यानंतर घरात जाऊन कुटुंबातील महिलांशीही त्यांनी संवाद साधला. लक्ष्मण जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे दादांसोबत असणारा जिव्हाळा नेहमी दिसून आला. आज त्याची प्रचिती या निमित्तानेही आली.
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारी 2023 रोजी निधन झालं.