Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी साधला संवाद....
पंतप्रधान मोदींनी हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली आणि विजेत्यांचे कौतुक केले. (PHOTO: PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर) दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. (PHOTO: PTI)
हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आणि एकूण 107 पदके जिंकली. यामध्ये 28 सुवर्ण,38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. (PHOTO: PTI)
आशियाई क्रीडा स्पर्धेची पुढील पर्व 2026 मध्ये जपानमध्ये होणार आहे.(PHOTO: PTI)
आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या पदकांपैकी निम्मी पदके महिलांनी जिंकली आहेत.(PHOTO: PTI)
यावेळी पंतप्रधानांनी क्रीडा मंत्रालयाच्या ;खेलो इंडिया' या प्रमुख कार्यक्रमाचे कौतुक केले. (PHOTO: PTI)
आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक करताना पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही १०० हून अधिक पदके जिंकली आहेत.पुढच्या वेळी आपण या विक्रमापेक्षा खूप पुढे जाऊ.पॅरिस (ऑलिम्पिक) साठी सर्वोत्तम प्रयत्न करा.(PHOTO: PTI)
सोशल मीडियावर फोटो शेअर करत पंतप्रधान म्हणाले की,आशियाई खेळांमधील भारताची पदकतालिका हे देशाच्या यशाचे द्योतक आहे.(PHOTO: PTI)
एक क्रीडा राष्ट्र म्हणून भारत योग्य मार्गावर असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.(PHOTO: PTI)
प्रत्येक अॅथलीटचे समर्पण आणि अगणित तासांची मेहनत प्रेरणादायी आहे, तुमच्या मेहनतीमुळे आणि यशामुळे संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे.(PHOTO: PTI)