Tata Safari Dark Edition: टाटा सफारी डार्क एडिशन आता नव्या रुपात; इंटेरियर्ससह पाहा कारचा दमदार लूक
नवीन सफारी फेसलिफ्ट प्रमाणे, याचं डार्क एडिशन देखील पूर्ण रुंद एलईडी लाइटिंग आणि नवीन फ्रंट डिझाईनच्या बदलांसह येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडार्क एडिशन अर्थातच गडद इन्सर्ट आणि डार्क ब्लॅक रंगात येते. या आधीच्या गडद लाल रंगाची सफारी देखील लाँच करण्यात आली होती.
नवीन सफारी फेसलिफ्ट डार्क एडिशनमध्ये मोठ्या अलॉय व्हील्ससह 19 इंचाची चाकं असून ती संपूर्ण काळ्या रंगातच उपलब्ध आहे.
कनेक्टेड LED लाइटिंगसह मागील स्टाईलिंग देखील नवीन आहे.
आतमध्ये, नवीन 12.3 इंच टचस्क्रीन आणि 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
नवीन फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर फ्रंट पार्किंग सेन्सर्ससह 360 डिग्री कॅमेरा, नवीन स्टॉप आणि गो अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोलसह 11 फिचर्ससह ADAS सूट तसेच 13 मोडसह 10 स्पीकर JBL ऑडिओ सिस्टमचा समावेश आहे.
कारमध्ये मूड लाइटिंगसह व्हॉइस असिस्टेड पॅनोरामिक सनरूफ आणि नवीन डिजिटल फोर स्पोक स्टीयरिंग व्हील देखील आहे.
नवीन सफारी डार्क 6 सीटर फॉर्ममध्ये आहे आणि त्यामुळे पहिल्या रांगेसह दुसऱ्या रांगेसाठीही हवेशीर जागा आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सफारी डार्क एडिशनमध्येही आता 7 एअरबॅग उपलब्ध आहेत
सफारी डार्क एडिशनमध्ये नवीन गीअर शिफ्टर मिळतो आणि यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक इंजिनसह 2 लिटर डिझेल युनिट आहे.