Photo Farmers Rail Roko : बळीराजाचा देशभरात एल्गार; शेतकरी संघटनांचं 'रेल रोको' आंदोलन

(Photo PTI Gallery)
1/7
तीन कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेलं शेतकरी आंदोलन आता आणखी आक्रमक झालं आहे. आज संयुक्त किसान मोर्चानं देशभर रेल्वे रोकोचं आंदोलन पुकारलं आहे. (Photo PTI Gallery)
2/7
आज देशभरात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल्वे रुळांवर धरणे प्रदर्शन करत ट्रेन रोखल्या जाणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये 144 अंतर्गत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. (Photo tweeted by @ikaur_deep)
3/7
संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण देशातील लोकांना माहिती आहे की, आपल्याला रेल्वे कुठं रोखायची आहे. भारत सरकारनं आमच्याशी या संदर्भात अद्याप काहीही चर्चा केलेली आहे. (Photo tweeted by @Vishallochab6)
4/7
शेतकरी नेते गुरमान सिंह चढूनी यांनी आवाहन केलं आहे की, शेतकरी बांधवांनी स्टेशन्सच्या जवळ जाऊन ट्रेन्स रोखाव्यात. (Photo tweeted by @Vishallochab6)
5/7
त्यांनी सांगितलं की, तीन कृषि कायद्यांना रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा, आणि लखीमपूर खिरी हत्याकांड प्रकरणी गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या अटकेच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन पुकारलं आहे. (Photo tweeted by @ikaur_speaks)
6/7
केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) 27 सप्टेंबरला 'भारत बंद' (bharat bandh) पुकारला होता. या बंदला अनेक राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला होता. (Photo tweeted by @yaddikhattra)
7/7
रेल्वे अलर्टवर आंदोलनामुळं रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खासकरुन उत्तरेकडील रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वेची संपत्ती आणि नुकसान वाचवण्यासाठी आरपीएफला देखील अलर्ट राहण्याचं सांगण्यात आलं आहे. (Photo tweeted by @sukhwinderptn)
Published at : 18 Oct 2021 12:24 PM (IST)