Nothing Phone (2) Offer : Nothing Phone (2) स्वस्तात विकत घेण्याची संधी
जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर नुकताच लॉन्च झालेला नथिंग फोन 2 हा देखील एक चांगला पर्याय आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलंडनस्थित स्मार्टफोन कंपनी नथिंगने मोठी घोषणा केली आहे. दिग्गज फोन ब्रँडने इंडिपेंडन्स डे सेल ऑफर सुरू केली आहे. या अंतर्गत स्वस्त दरात नथिंग फोन 2 खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. हा फोन 44,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
मात्र, कंपनी हा फोन 7,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह आता ग्राहकांना विकणार आहे.
नथिंगचे Co-Founder कार्ल पेई यांनी एका प्रसिद्धीपत्रकात भारतीय ग्राहकांसाठी असलेल्या सवलतीच्या ऑफरची माहिती दिली.
नथिंग फोन 2 खरेदी केल्यावर, कंपनी ICICI बँक, कोटक बँक आणि HDFC बँकेच्या ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंतचा झटपट कॅशबॅक देईल .
याशिवाय, जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून नथिंग फोन 2 खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.
कशाचीही ऑफर फक्त इथेच संपत नाही. सेल दरम्यान, कंपनी Nothing Phone 2 अॅक्सेसरीजवर देखील भरघोस सूट देखील देईल.
फोनचे स्क्रीन प्रोटेक्टर फक्त 399 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही नथिंग फोन 2 चा पॉवर अडॅप्टर रु. 1,999 मध्ये खरेदी करू शकता.
आगामी फोनमध्ये 33 LED लाईट्स असतील , जे आधीच्या फोनपेक्षा खूप जास्त आहे. Nothing 1 मध्ये कंपनीने 12 LED लाईट्स आहेत. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो.
त्यात 4700mAh बॅटरी आहे. तर या फोनला 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट आहे. UFS 4.0 स्टोरेज सोल्यूशन फोनमध्ये मिळू शकत नाही, कारण हे फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दिले जात आहे.