धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली

विरार पूर्व चंदनसार रोड येथील गणपती मंदिराजवळ मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विरार पूर्व चंदनसार रोड येथे गणपती मंदिराच्या नजीक एक धक्कादायक घटना घडली. दगड भरुन जाणाऱ्या ट्रकचा मागील भाग अचानक वर उचलला गेल्याने ट्रकवरील सर्व दगड रस्त्यावर पसरले.

सुदैवाने, या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्यावर पडलेल्या दगडांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, स्थानिक नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करून रस्ता मोकळा केला.
या प्रकारामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक आणि परिवहन प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक तरुणांनी मध्यस्थी करुन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दगड बाजूला करण्यात आले. त्यानंतर, संबंधित ट्रकही बाजूल करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, अपघातानंतर बघ्यांची गर्दी येथील रस्त्यावर पाहायला मिळाली, ट्रकचा पुढील भाग उंच उचलला गेला होता. तर, मागील डंपर पलटी झाल्याचे दिसून आले.
अपघाताच्या घटनेनंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक व वाहनाचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचे पाहायला मिळाले.