PHOTO : मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गाच्या कामामुळे स्थानिकांच्या घरांना तडे
मुंबई-वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका घेतलेल्या आरकेसी या कंपनीकडून (RKC) इथल्या स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं समोर आलं आहे.
डहाणूत उत्खननासाठी भूसुरुंग स्फोट केले जात आहेत.
या स्फोटात उडालेले भले मोठे दगड थेट येथील नागरिकांच्या घरांवर पडून घरांचं तसंच घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.
डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीतील नवनाथ कोहराळी पाडा येथे सध्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी डोंगर सपाटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे.
मात्र यासाठी भुसुरुंग स्फोटांचा वापर करण्यात येत असून स्फोटांत उडालेल्या भल्या मोठ्या दगडांमुळे येथील 20 पेक्षा अधिक घराचं आणि घरांतील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.
सुदैवाने या भागातील अनेक नागरिक हे दिवसा आपल्या शेतीच्या कामानिमित्त घरांबाहेर असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही
परंतु घरांमधील टीव्ही, कपाट, फॅन, घरावरील पत्रे, भिंत, कौलांचं मोठं नुकसान झालं आहे.
डहाणू हा ग्रीन झोन असल्याने या तालुक्यात भूसुरुंग स्फोट करण्यास मनाई आहे. मात्र केंद्राचा प्रकल्प असल्याने या कामासाठी भूसुरुंग स्फोटांना काही नियमांच्या चौकटीत परवानगी देण्यात आली आहे.
मात्र या सगळ्यात येथील गरीब आदिवासींचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.