PHOTO : रोह्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हतबल
सध्या रब्बी हंगाम बहरला असून माळरानात गहू, हरभरा, कांदा पिकांची लागवड करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या वातावरणही पोषक असल्याने पिके चांगल्या परिस्थितीत आहेत.
मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर परिसरात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान होत आहे.
यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
देऊळगाव माळी येथील गजानन गिऱ्हे नावाच्या शेतकऱ्याने रोह्यांमुळे पिकांचं होत असलेलं नुकसान दाखवत आपली हतबलता फेसबुकद्वारे व्यक्त केली आहे.
तसंच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नैसर्गिक संकट आणि आता वन्यजीवांच्या संकटामुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भविष्यात शेतकरी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, अशी उद्विग्नना शेतकऱ्याने बोलून दाखवली.
शेती हा व्यवसाय आहे आणि सरकार व्यावसायिकांना जशा सुविधा देतो त्यापेक्षा जास्त सुविधा शेतकऱ्यांना द्याव्या, अशीही मागणी शेतकऱ्याने केली
नुसताच बळीराजा, जगाचा पोशिंदा अशा मोठमोठ्या बिरुदावली लावून त्याला मिरवू नये, असं या शेतकऱ्याने म्हटलं आहे.