Mahua Flowers: मोहाची फुलं ठरतायत आदिवासींसाठी वरदान
पालघर (Palghar) जिल्हा हा विविधतेने नटलेला असून सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन विभागात विभागलेला हा जिल्हा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया जिल्ह्याला नैसर्गिक साधन संपत्ती पूर्वापार लाभली असून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तसेच डहाणू तालुक्यातील नैसर्गिक, भौगोलिक रचनेनुसार डोंगर-दऱ्यात मोहाचे झाड आपोआप वाढते.
मोहाला (Mahua) कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते. पालघर येथील आदिवासी मोह फुलांच्या मदतीने मद्य तयार करतात.
परंतु नुकताच शासनाने मोहाच्या फुलांची दारू करण्याची परवानगी दिल्याने आदिवासी नागरिकांना एक उत्तम रोजगार उपलब्ध झाला आहे.
परंतु ही फुले नेमकी द्यायची कुठे असा संभ्रम कायम आहे. काही नागरिक शहरातील बाजारात मोह फुले आणून त्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू खरेदी करत असल्याने मोह फुले जमवून व्यावसायिक जास्त नफा घेत असल्याचे चित्र आहे.
मोहाच्या फुलांची वाहतूक, साठवणूक आणि त्यानंतर आता मोह फुलापासून तयार झालेली दारु अधिकृतरीत्या विक्री करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी तर दिली.
परंतु संकलित होणारे मोह फुलं नेमकी विकायची कुठे असा प्रश्न आदिवासी नागरिकांसमोर आहे. मोह फुलं खरेदी करणारे शासकीय केंद्रच नसल्याने खासगी व्यापाऱ्यांनाच मोहाच्या फुलांची विक्री करावी लागणार आहे.
यात संकलन करणाऱ्या गरजूंपेक्षा व्यापाऱ्यानांच अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील जंगलातून मोठ्या मेहनतीने मोह फुले जमवली जात आहेत.
परंतु ही फुले कुठे विकायची हे माहित नसल्याने काही व्यापारी मोह फुले घेऊन त्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू देत आहेत. त्यामुळे मोह फुलांपासून होणारा फायदा व्यावसायिक घेत आहेत.