महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी चालवली रेल्वे अन् लोकल
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण महिला विशेष उपनगरीय लोकल सर्व महिला कर्मचाऱ्यांसह चालविण्यात आली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेच्या मुंबई विभागा द्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने मुंबई- पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण महिला विशेष उपनगरीय लोकल सर्व महिला कर्मचारी दलासह चालविण्यात आली.
ट्रेन क्रमांक 12123 मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आशियातील पहिल्या महिला लोको-पायलट सुरेखा यादव यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक लोको पायलट सायली सावर्डेकर यांच्यासोबत चालवण्यात आली.
लीना फ्रान्सिस यांनी ट्रेन मॅनेजर (गार्ड) ची जबाबदारी पार पाडली.
रेल्वे प्रवाशांना जीजी जॉन आणि दीपा वैद्य या दोन्ही मुख्य तिकीट निरीक्षक / कंडक्टर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नीता, रुबिना, बीना, सुरक्षा, रंजुषा आणि जेन या ६ महिला मुख्य प्रवासी तिकीट परीक्षकांच्या पथकाने मार्गदर्शन व मदत केली.
K99- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण महिला विशेष उपनगरीय लोकल आशियातील पहिल्या उपनगरीय मोटरवुमन मुमताज काझी व महिला उपनगरीय गार्ड, मयुरी कांबळे यांच्या नियंत्रणात चालविण्यात आली.
मुंबई विभागात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.