भाजपची वॉशिंग मशीन, पुण्यात राष्ट्रवादीचे उपरोधिक आंदोलन
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपच्या गोटात सामिल होताच त्यांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा थांबतो आणि ते एकदम स्वच्छ चारित्र्याचे नेते बनतात हा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील विरोधक हा आरोप पुन्हा एकदा करु लागलेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज यालाच अनुसरून उपरोधिक स्वरूपात भाजपची वॉशिंग मशीन आंदोलन करण्यात आलं.
या वॉशिंग मशीनमधे आरोपांचे सगळे दाग धुवून मिळतात . घोटाळ्याचे कितीही गंभीर आरोप असलेला नेता एकदा का या भाजपच्या वॉशिंग मशीन मधे गेला की तो पुर्ण स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न होऊनच बाहेर पडतो.
भाजपच्या या वॉशिंग मशीन साठी वापरली जाणारी डिटर्जंट पावडर देखील तेवढीच खास आहे. ही वॉशिंग मशीन इतकी स्ट्राँग आहे की हिचा स्पर्श होताच ईडी , सी बी आय, इनकम टॅक्स यासारख्या तपास यंत्रणा जवळपास देखील फिरकत नाहीत.... पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने या भाजपच्या वॉशिंग मशीनची ही महती सांगणारं आंदोलन केलं.
शिंदें-फडणवीस सरकारमधे ज्यांना मंत्रीपद देण्यात आलंय, अशा नेत्यांच्या विरोधात भाजपनेच कधीकळी आरोपांची राळ उठवली होती.
मग राधाकृष्ण विखे पाटीलांच्या ताब्यातील विज वितरण संस्थेतील भ्रष्टाचाराचे आरोप असोत, विजयकुमार गावित यांच्या विरोधातील आदिवासी विकास निधीतील भ्रष्टाचाराचा आरोप असो किंवा संजय राठोड यांच्यावर पुण्यातील तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप असो... मात्र हे नेते भाजपच्या गोटात सामिल झाले आणि त्यांच्याविरुद्धच्या चौकशा थांबल्या.
भाजपमधे डेरेदाखल होऊन पवित्र झालेल्या राज्यातील नेत्यांची यादी प्रचंड मोठी आहे. नारायण राणे, कृपाशंकर सिंग, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, यासारख्या आज भाजपची बाजू मांडणाऱ्या नेत्यांच्या विरोधात भाजपनेच कधीकाळी किरिट सोमय्यांना पुढे करुन चौकशची मागणी केली होती.
पण या नेत्यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमधे स्वच्छ होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावरच चौकशीच संकट तर टळलच शिवाय कोणाला आमदारकी, कोणाला खासदारकी तर कोणाला मंत्रीपद अशी बक्षिसं मिळाली.
त्यामुळेच येणाऱ्या काळात अणेकजण भाजपच्या या वॉशिंग मशीनचा रस्ता धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपच्या विरोधकांसमोर सध्या दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तो कथित घोटाळ्यांमधे चौकशी होऊन तुरुंगात जाण्याचा. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत हे या मार्गावरचे वाटसरु आहेत.
तर दुसरा मार्ग आहे तो भाजपच्या या वॉशिंग मशीनमधे स्वतःला स्वच्छ करण्याचा आणि एखादं चांगल पद पदरात पाडून घेण्याचा.
अर्थात येणाऱ्या काळात या दुसऱ्या मार्गावर येणार्यांची गर्दी आणखीन वाढणार आहे. भाजपच्या विस्तारामधे या वॉशिंग मशीनचा किती महत्व आहे हे यावरून लक्षात यायला हरकत नाही.