Shiv Jayanti 2023: सात फूट उंच अन् 150 किलो वजन; शिवजयंती निमित्त नवी मुंबईत साकारली भव्य वाघनखांची प्रतिकृती
आज शिवजयंती... आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय.
शिवजयंती उत्सवानिमित्त कळंबोलीमध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्धा शिवप्रेमींसाठी देखाव्याचं आयोजन करण्यात आलंय.
या देखाव्यात वाघ नखांची प्रतिकृती दर्शवण्यात आली आहे.
अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेल्या वाघ नखांची प्रतिकृती येथे तयार करण्यात आली आहे.
यामध्ये दीडशे किलो वजनाची आणि 7 फुट उंच वाघनखांची प्रतिकृती तयार करण्यात आल्यानं शिवप्रेमी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
कळंबोलीमधील घाटी मराठी संघटना यांच्यातर्फे या वाघनखांचा देखावा तयार करण्यात आला आहे.
इतिहासाची आठवण व्हावी, या उद्देशानं घाटी मराठी संघटनेच्या वतीनं दरवर्षी ऐतिहासिक देखावा शिवजयंती निमित्त साकारला जातो.