Kharghar Road : 15-20 वर्षांत झाला नाही तो रस्ता एका दिवसात बनला, मंत्री येणार असल्याने पनवेल मनपाची किमया
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रस्ता बनावा अशी मागणी करणाऱ्या खारघरवासियांचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचं कारण ठरलं डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणारा सन्मान सोहळा.
या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खारघरमध्ये येणार आहेत.
यावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आणि तोही एका दिवसात.
त्यामुळे जो रस्ता 15 ते 20 वर्षात बनला नाही, तो मंत्र्यांच्या कृपेने अवघ्या एका दिवसात बनल्याने खारघरवासियांचं नशीबच पालटलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
खारघरमधून सायन पनवेल हायवेवर बाहेर पडता यावं म्हणून कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षे झाली जो रस्ता बनला नाही तो एका दिवसात तयार करण्याची कमाल पनवेल महानगरपालिकेने केली आहे.
हा रस्ता बनावा यासाठी खारघरवासीय 20 वर्षांपासून मागणी करत आहेत. त्यांच्या या मागणीकडे पनवेल महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले.
मात्र आता मंत्रिमंडळ खारघरमध्ये येत असल्याने एकाच दिवसात मोठा रस्ता तयार करण्याचे मोठं काम पनवेल महानगरपालिकेने केले आहे.