Mandira Bedi Birthday Special: 'शांती' मालिकेमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारी मंदिरा बेदी आज आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या संपत्तीबद्दल...
आज अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) 51 वा वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिरा ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. मंदिरानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.
मंदिराचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला.
मंदिराला ऑडिशन दिल्यानंतर पहिला ब्रेक 1994 मध्ये डीडी नॅशनलच्या 'शांती' या मालिकेमधून मिळाला.
'शांती' मालिकेनंतर मंदिरानं अनेक मालिकांमध्ये काम केलं . 'औरत', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'इंडियन आयडॉल', 'फेम गुरुकुल', 'डील या नो डील' या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात देखील मंदिरानं काम केलं.
मंदिरा बेदी ही कोट्यवधींची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 2.3 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 18 कोटी रुपये आहे.
एका चित्रपटासाठी मंदिरा ही 50 लाख ते 1 कोटी रुपये मानधन घेते.
मंदिरा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. ती वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.