Mumbai Police Bharti: अवकाळी पावसाचा फटका पोलीस भरतीच्या उमेदवारांना; मुंबईत होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलली
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) अनेकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र पोलीस भरतीचे स्वप्न मुंबईत घेऊन आलेल्या मुलांचे हाल होत आहे.
राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसला आहे.
मुंबईच्या नायगाव पोलीस मैदानावर आज पोलीस भरतीची मैदानी चाचणी होती. या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार मुंबईत दाखल झाले होते.
मात्र पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने मैदानात चिखल झाला.
त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढची प्रक्रिया ही 25 मार्च रोजी होणार आहे
राज्यातल्या कानाकोपऱ्यातून अनेक उमेदवार पोलीस भरतीसाठी मुंबई येथील नायगाव पोलीस मैदानावर आले आहेत
अनेक तरुण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरुन भरतीसाठी हे तरुण येतात.
त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरता तरुणांची किमान राहण्याची सोय करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.