Tribal Development Department : आदिवासी विभागात अधिकाऱ्याची केबिन,टेबल फुलांनी सजवून वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

आदिवासी विकास विभागाच्या उप आयुक्तांच्या सरकारी कार्यालयात अधिकाऱ्याचा धडाकेबाज बर्थडे साजरा करण्यात आला. हे सेलिब्रेशन व्हायरल झाल्यानंतर मात्र त्याचं खापर कर्मचाऱ्यांवर फोडण्यात आलं. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कायमच कुठल्यानं कुठल्या कारणांमुळे चर्चेत राहणारा आदिवासी विकास विभाग अधिकाऱ्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)

आदिवासी विकास विभागाचे उप आयुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस बुधवारी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. साहेबांची केबिन, टेबल सर्वकाही फुलांनी सजविण्यात आले होते. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
एवढंच नाही तर आनंदाच्या भरात साहेबांची खातिरदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच कोल्ड फायर लावून साहेबांच्या वाढदिवसाला चार चांद लावून टाकले.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
एखाद्या सेलिब्रिटीच्या स्टेज शो सारखा माहोल आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात बघायला मिळत होता. पार्टी बोअम्बरने साहेबांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत Boss नाव लिहिलेल्या केकचे कटिंगही करण्यात आले.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
कल्पनेपेक्षाही जोरदार वाढदिवस साजरा झाल्यानं साहेबही भारावून गेले आणि तेवढ्यात अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून या साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
यांसंदर्भात एबीपी माझाने आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्यांशी संपर्क साधला असता या सेलिब्रेशन बाबत त्यांना माहिती नव्हती. तर स्वतः उप आयुक्त सुदर्शन नगरे यांनीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होईल याची कल्पना नसल्याची माहिती एबीपी माझाला दिली. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
भविष्यात सरकारी कार्यालयात या पद्धतीने कोणाचाच वाढदिवस साजरा होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. आदिवासी विभागामध्ये धुमधडाक्य़ाने साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाची चर्चा मात्र सर्वत्र जोरदार सुरू आहे. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
ज्या वेळी कार्यालयात हा वाढदिवस साजरा होत होता त्याचवेळी कार्यालयाबाहेर आदिवासींच्या एका प्रश्नावरून आंदोलन सुरू होतं. त्याकडे मात्र अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं नसल्याचं सांगितलं जातंय. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)
वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि वरिष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी काहीच हरकत नाही. मात्र आपण कोणत्या जागेत आणि कशा प्रकारे वाढदिवस साजरा करतो, याचे भान कमीतकमी कर्मचाऱ्यांनी बाळगायला पाहिजे होते. निदान यापुढे तरी असे प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी, मुकुल कुलकर्णी, नाशिक)