Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सहा दिवस बंद, नेमकं कारण काय?

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नव्या कसारा घाटातून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

मुंबईहून नाशिककडे येणारा मार्गावरील जुना घाट देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे.
आजपासून (दि. 24) ते 27 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीस बंद राहणार आहे.
तर ३ मार्च ते ६ मार्च पर्यंतही सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जुना कसारा घाट बंद आहे.
पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाट बंद करण्यात आलाय.
या कालावधीत नाशिक-मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवण्यात आली आहे.
या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून अवजड वाहने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या मार्गे वळविण्यात आली आहे.