Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chetak Festival : चेतक फेस्टिवलमधील अश्व क्रीडा स्पर्धांचा थरार...डोळ्यांचं पारणे फेडणाऱ्या कसरती
चेतक फेस्टिवलमधील अश्व क्रीडा स्पर्धांचा थरार...अश्वांची डौलदार चाल, विशिष्ठ टप्प्यावर घेतलेली झेप आणि रायडरने दिलेल्या इशाऱ्यानुसार वळणारे आणि धावणारे अश्व.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये यावर्षी पहिल्यांदाच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व नृत्य स्पर्धा, घोड्यांचा रेस, तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यासोबत घोडेबाजाराची तयारी पूर्ण झाली असून देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे आतापर्यंत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या वर्षी घोडे बाजारात तीन हजार पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे.
अशा अश्वारोहणाच्या विविध थरारक कसरतांनी चेतक फेस्टीव्हल मधील अश्व मैदानावरील स्टेडीयम वर शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अश्व क्रीडा स्पर्धांमधील थरार पाहण्यासाठी अश्व शोकिनांची मोठी गर्दी होत आहे.
अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये चेतक एक्वाईन प्रिमियर लिग मध्ये अश्व स्टेडीयममधील क्रीडा स्पर्धा आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत.
घोडयांची अडथळे व शो जंपीग आदी प्रकारच्या अश्वरोहणाची विविध पैलुंची स्पर्धा पार पडत आहेत. यात राज्यातील सैनिकी महाविद्यालयातील ४० हुन अधिक अश्वरोहकांनी सहभाग नोंदविला.
यावेळी हजारो क्रिडा शौकिनांच्या गर्दीने मैदान फुलुन गेले होते. सहभागी झालेल्या अश्वांच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार फेऱ्या झाल्या. प्रत्येक अडथळ्यांना पार करत रायडरांच्या दिलेल्या आज्ञांचे पालन अश्व करत होता .
रायडरच्या इशाऱ्यानुसार धावत येणारे अश्व लावलेल्या बांबु व लहान मार्गातून धक्का न लावता अंतर पार करतात. अश्वावर नियंत्रण ठेवण्याचे कसब दाखवत होता. एकाहून एक सरस अशा तंदुरुस्त अश्वांनी घेतलेली उंच झेप, त्यांना सावरण्यासाठी रायडरने खेचलेला लगाम, वेळेनुसार अंतर पार करणे असे विविध क्रिडापैलू पाहण्यास मिळाले.
अश्वांच्या कसरतींना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत या नव्या खेळाविषयीची उत्सुकता अधिक दृढ केली. 18 डिसेंबर पासून चेतक फेस्टिवल मध्ये होणाऱ्या अश्वसौंदर्य, अश्व नृत्य, घोड्यांची रेस अशा एकाहून एक सरस अशा स्पर्धा होणार आहेत.
चेतक फेस्टिवलमधील विविध स्पर्धांसाठी देशभरातील अश्वप्रेमी आणि अश्व मालक सारंगखेडा येथे दाखल झाले आहेत. आपल्यालाही घोड्यांच्या या कसरती बघण्याची इच्छा असेल तर एक वेळेस भेट देणे आवश्यक आहे. (सर्व फोटो : भिकेस पाटील, एबीपी माझा नंदुरबार)