Nashik Satyajeet Tambe : एकच वादा, सत्यजीत दादा, औक्षण, कार्यकर्त्यांचा जल्लोष, सत्यजित तांबेचे विजयी स्वागत
नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला असून सत्यजित तांबे यांनी अखेर दणदणीत विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला असून पुन्हा एकदा तांबे कुटुंबीयांकडे सत्यजीत तांबेच्या रूपात चौथी टर्मही पाहायला मिळणार आहे.
राज्यातील पाच शिक्षक पदवीधर मतदारसंघांचा निकाल लागला असून या सर्वांमध्ये नाशिकच्या पदवीधर निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे.
यावेळी मतमोजणी केंद्राबाहेरच कार्यकर्त्यानी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. तर तांबे कुटुंबीय आज नाशिकमध्येच असल्याने अनेक कुटुंबातील महिलांनी त्यांचे औक्षण केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी झाले असून सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मत मिळाली आहेत.
तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मत मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.
सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला.
पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. सुरवातीपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला.
युवा नेतृत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ, सत्यजित तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम करत आहेत.
जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी मतदार संघामध्ये जोरदार अशी मोर्चेबांधणी केली आहे. या सगळ्यांचा सत्यजित तांबे यांच्या विजयात मोठा वाटा आहे.