Nashik Mahashivratri : नाशिक जिल्ह्यातील अतिप्राचीन महादेव मंदिरे, महाशिवरात्रीला अवश्य घ्या दर्शनाचा लाभ
नाशिक शहर (Nashik) असो किंवा जिल्हा धार्मिक परंपरेचा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. प्रत्येक गावात पुरातन मंदिरे आपल्याला आढळून येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे.
नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील (Panchavati) गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. देशातील सर्वच महादेव मंदिरात नंदी पाहायला मिळतो.
त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर हे भारतीतील बारा जोतिर्लिंगापैकी एक आहे. नाशिक शहरापासून 28 किमी आणि नाशिक रोडपासून 40 किमी अंतरावर असलेल्या त्र्यंबक शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर आहे.
सोमेश्वर मंदिर हे नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापुर रस्त्यावर आहे. गोदावरी तीरी असलेल्या या मंदिरात भगवान शिव व हुनुमानाची मुर्ती असुन परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे.
मंदिर पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी बांधले होते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे.
नाशिकच्या पंचवटी जवळील गोदावरी नदीच्या काठावर नारोशंकराचे हे सुंदर मंदिर वसलेले आहे. हे मंदिर 1747 मध्ये नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी अद्वितीय शैलीमध्ये बांधले होते.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे गोंदेश्वर महादेवाचे अति प्राचीन मंदिर आहे. मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून 1909 साली घोषित केलेले आहे.
अंजनेरी पर्वतरांगेत हे मंदिर असून ‘प्रतिकेदारनाथ’ म्हणून अलीकडे हे मंदिर प्रचलित झाले आहे. सध्या भाविकांचे हे मंदिर मुख्य आकर्षण ठरत आहे.
सोमेश्वर हे चित्रपटांच्या शूटिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. सोमेश्वरला जाताना ‘’आनंदवल्ली’’ नावाचा परिसर लागतो.
गोंदेश्वर महादेव मंदिर 12 व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते.