Nashik Gudhipadwa : नाशिकच्या चांदीच्या गणपतीला अकराशे किलो द्राक्षांची आरास, दर्शनासाठी नाशिककरांची गर्दी
रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात आकर्षक असा गणपती बाप्पाचा द्राक्ष महोत्सव साजरा केला जात आहे. सुमारे अकराशे किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. यावेळी गणेश भक्तांची दर्शनासाठी लगबग आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने चांदीच्या गणपती मंदिरात गुढी पाडव्याच्या निमित्ताने साडे सहाशे द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. दरम्यान ही भव्य द्राक्षांची आरास पाहण्यासाठी व गणेश दर्शनासाठी नाशिककरांसह अनेक भाविक गर्दी करत आहेत.
रविवार कारंजा म्हटलं की चांदीचा गणपती हे समीकरण ठरलेलं आहे. या ठिकाणी 90 वर्षांपासून हे चांदीचा गणपती मंदिर आहे. परंतु 1978 साली रविवारी कारंजा मित्र मंडळाने या मंदिरात चांदीची मूर्ती बसवली.
तेव्हापासून रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती नाशिककरांचे आकर्षण ठरू लागला आहे. नेहमीच धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रविवार कारंजा मित्रमंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.
नवीन वर्ष सुख, शांती व आनंदाचे जावो, यासाठी आपण गणरायाचरणी नतमस्तक होत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीचा गणपती मंदिराला विशेष आरास करण्यात आली आहे.
ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवसेवेचा वसा असाच पुढे सुरु राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
चांदीचा गणपती ट्रस्ट, रविवार कारंजा तरुण मंडळतर्फे गणपती मंदिरात गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाल्याने सकाळपासूनच चांदीच्या गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नाशिक शहरातील चांदीचा गणपती यासह सर्व गणेश मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती मंदिरात आकर्षक असा गणपती बाप्पाचा द्राक्ष महोत्सव साजरा केला जात आहे.
सुमारे अकराशे किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. यावेळी गणेश भक्तांची दर्शनासाठी लगबग आहे.