Saptshrungi Gad : सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, पाहा अपघाताचे फोटो
Nashik Accident News : सप्तशृंगी गडावरील बस अपघातातील जखमींवर शासनाच्या माध्यमातून उपचार केले जातील तर मृत महिलेच्या नातेवाईकांना एसटी महामंडळाकडून दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. तर उर्वरित जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास सप्तशृंगी घाटात एसटी बसचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. सप्तशृंगी घाटातील गणपती पॉईंटजवळ बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे.
या अपघातात 1 महिला प्रवासी ठार झाली असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत. चार जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात तर अन्य अकरा महिलांसह 2 पुरुषांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु आहेत.
जखमींवर शासनाच्या माध्यमातून उपचार केले जातील तर मृत महिलेला एसटी महामंडळाकडून दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
दरम्यान अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती.
त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरु झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरुन खाली येताना अपघात होऊन बस थेट 400 फूट दरीत कोसळली.
या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अठरा प्रवासी जखमी असून सर्वाधिक जखमी प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी येथील आहेत.
दरम्यानतेरा जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नाशिक जिल्हा रुग्णालयात 15 बेड्स राखीव ठेवण्यात आले होते.
सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी हा अपघात झाला दाट धुक्यामुळे एका वळणावरुन कदाचित बस ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.