In Pics : जेवणाला पिठलं भाकरी अन् वाचायला भन्नाट पुस्तक, नाशिकच्या आजीबाईंचं अनोखं हॉटेल
आज अवघं जग मोबाईलच्या आहारी गेलं आहे, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्रीचा गुड नाईट सुद्धा मोबाईलवरच होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या ओझर जवळील भीमाबाई जोंधळे या 72 वर्षीय आजीबाईंनी पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं आहे. होय, पुस्तकांच हॉटेल दचकलात ना?
आज भिमाबाईच्या हातची पिठलं- भाकरी चांगलीच फेमस आहे, त्या स्वतः बनवतात. नागलीच्या, बाजरीच्या भाकरी, झणझणीत पिठलं हे खवय्यांना त्यांच्या हातचं खूप आवडतं.
पुस्तकांची गोडी लागावी, समाजात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जोंधळे आजीबाईनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करुन दिली आहे.
नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रात पुस्तकांचं हॉटेल नावारुपास आले आहे. आजीबाईंच्या या हॉटेलात बसल्यानंतर जणू लायब्ररीत बसल्याचा भास होतो.
ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था तर दुसऱ्या बाजूला प्रशस्त लायब्ररी ग्राहकांच्या नजरेस पडते. त्याचबरोबर हॉटेलच्या भिंती नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात.
72 वर्षाची असूनही त्यांना अजून चष्मा नाही. मी जर पुस्तक वाचू शकते, तर प्रत्येकाने पुस्तक वाचायला हवं, अशी माझी इच्छा आहे.
बारा वर्षांपासून हॉटेल चालवत आहेत, गेल्या सात वर्षांपासून पुस्तक ठेवण्यास सुरवात केली. मेन्यूकार्ड कमी करुन पुस्तकांची वाढ केली.
गेल्या 23 वर्षांपासून पेपर एजन्सीचे काम करत असून पहिले आणि शेवटचे पान सोडत नाही अजूनही अशा भावना जोंधळे आजी बाई व्यक्त करतात.
मोबाईल हा आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. अनेक वर्षांपासून मोबाईल वापरासंबंधी जनजागृती होत आली आहे.
नाशिकच्या 72 वर्षाच्या आजीबाई देखील उतरल्या आहेत. या आजीबाईंनी मोबाईल बाजूला ठेवायला सांगून वाचन वाढवण्यासाठी अनोखा प्रयोग राबवला आहे.