नाशिकच्या पुराची भयंकर प्रचिती, गोदाघाटावर भलेमोठे दगड आले वाहून, पाहा PHOTOS

नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कमी झाली आहे. गोदेचा पूर ओसरला आहे. हा पूर किती भयंकर होता, पाण्याचा प्रवाह किती जोरात होता याची प्रचिती पूर ओसरल्यानंतर येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोदा पात्रात आणि काठावर मोठं मोठे दगड वाहून आले आहेत.

होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेटचे काम सुरू आहे. होळकर पुलाखालून 11 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगड वाहून आले आहेत.
घनकचरा व्यवस्थापनाकडून आता गोदावरी नदीमध्ये वाहून आलेला कचरा हटविण्याचे काम सुरु आहे.
स्मार्ट सिटीच्या गोदा घाट सुशोभीकरणाच्या कामाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
नदीपात्रात महापालिकेकडून स्वच्छता केली जात आहे.
पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या पानवेली बाहेर काढल्या जात आहेत.
गोदावरी नदीचा पूर पूर्णतः ओसरल्यानंतर नेमकं किती दगड वाहून आलेत? हे स्पष्ट होणार आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे.