Onion : नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा
राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी संकटात असतानाच, काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या लाल कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर मिळत आहे. तर उन्हाळी कांद्याला 100 ते 1000 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप तरी कोणत्याही बाजार समितीत नाफेडने (Nafed) कांदा खरेदी सुरु केल्याचे दिसत नाही.
नाफेडकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात दिली होती. मात्र, अद्यापही बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली नाही.
राज्यात अवकाळी पावसामुळं बळीराजा अक्षरश:मेटाकुटीला आला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळं अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे.
राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांन 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलं आहे. त्याचा हातभार मात्र शेतकऱ्याला लागू शकतो.
शेतकऱ्याच्या कांदा उत्पादनाला नाफेडकडून जास्तीचा भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, सध्या बाजार समितीत नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु झाली नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नाफेडकडून (Nafed) कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती विधीमंडळात दिली होती.
अद्याप बाजार समितीत नाफेडकडून कांद्याची खरेदी झाली नाही.
सध्या लाल कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर मिळत आहे. तर उन्हाळी कांद्याला 100 ते 1000 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.