नोकरीसोडून शेतीकडे वळला, पण आता टोमॅटोने रडवलं!
बारावीनंतर डीएड केलं, त्यानंतर व्यवसाय केला. मात्र आपली घरची शेती असल्याने शेतीत उतरलो. मात्र रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेल्या टोमॅटोला दोन किलो भाव मिळाला. आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकार कोणतंही येवो, शेतकऱ्याचं मरण ठरलेले आहे, त्यामुळे टोमॅटो पिकाला भाव मिळावा एवढीच अपेक्षा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील हिरडी येथील शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणारे बाजारपेठेत (Girnare Vegetable Market) टोमॅटोचा एकदमच कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून टोमॅटो (Tomato) रस्त्यावर फेकण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.
एकीकडे मोठ्या कष्टाने उभा केलेली टोमॅटोची शेती मात्र दुसरीकडे दिवाळीनंतर (Diwali) भावच कोसळल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.
मार्केट परिसरात हिरडी (Hirdi) येथील तरुण शेतकऱ्याने देखील यंदा मोठ्या मेहनतीने टोमॅटोचे पीक घेतले मात्र टोमॅटोचे पीक ऐन भरात असताना अवघा सव्वा दोन रुपये किलो भाव मिळाल्याने हताश होऊन संताप व्यक्त केला.
टोमॅटोचा लाल चिखल होण्याची भिती व्यक्त केली जात असतांनाच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावी एक एकरावर भगवान महाले या तरुण शेतकऱ्याने टोमॅटोची लागवड केली आहे. डीएडचे शिक्षण घेऊन नोकरी न मिळाल्याने महाले यांनी टेलरिंग व्यवसायासोबतच शेती करण्यास सुरुवात केली होती.
टोमॅटोचे पिक घेऊन पैसा मिळेल या आशेने त्यांनी शेतात टोमॅटो लावला होता. वातावरणातील बदल, अवकाळी पावसाचा सामना करून मोठ्या कष्टाने त्यांनी आपली बाग वाचवली आणि न खचता पुन्हा ते उभे राहिले होते, मात्र आता टोमॅटोला मिळालेला हा भाव बघता त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिल आहे.
यावेळी एबीपी माझाशी बोलताना भगवान महाले (Bhagwan Mahale) हे तरुण शेतकरी म्हणाले कि, बारावी झाल्यानंतर डीएडचे शिक्षण घेतले. मात्र नोकरीसाठी प्रयत्न करूनही नोकरी मिळाली. नाही शेवटी व्यवसाय म्हणून टेलरिंग सुरु केली. व्यवसाय हंगामी असल्याने शेतीत उतरण्याचे ठरवले.
त्यानुसार यंदा टोमॅटो लागवड केली. जवळपास एक एकरावर तीन पुड्यांची म्हणजेच तीन हजार झाडे लावली. सुरवातीपासून घरच्यांसह प्रचंड मेहनत घेऊन पीक उभं केले.
दिवाळी आली, मात्र टोमॅटो सुरु नसल्याने हातावर हात धरून होतो. मात्र दिवाळीनंतर पीक निघू लागले. तर दुसरीकडे अचानक टोमॅटोच्या दरात एकदमच घसरण झाली. अन् सगळं मातीमोल झालं.
एकीकडे शेतातील उभं पीक वाचवायच म्हणून इकडून तिकडून पैशांची देवाण घेवाण केली. वाटल होत उत्पादन खर्च निघून काही अंशी का होईना हाती दोन पैसे लागतील. फवारणीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. चांगला भाव मिळाला म्हणजे पुढे भांडवल उभार करता येईल. अशी इच्छा होती. मात्र घडलं उलटच. दिवाळीनंतर मात्र भाव कोसळले. काल तर 65 कॅरेट बाजारपेठेत नेल्यानंतर अवघा 45 रुपये भाव कॅरेटला मिळाला आहे. म्हणजेच सव्वा दोन रुपयांचा भाव मिळाल्याने भांडवल दूरच राहील असून फक्त भाजीपाला सुटल्याची प्रतिक्रिया महाले यांनी दिली.