स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुद्वारा पाटणा साहिब येथे जाऊन प्रार्थना केली, यावेळी गुरुद्वारामध्ये लंगरसेवा देण्याचं कामही पंतप्रधानांनी केल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोक्यावर पगडी परिधान करुन मोदींनी गुरुद्वारामध्ये पाटणा साहिब यांच्यापुढे माथा टेकवला. त्यानंतर, येथील शिख बांधवांनी आपुलकीचा संवादही साधला.
नरेंद्र मोदींनी आज बिहारच्या पाटणामधील गुरुद्वारा पाटणा साहिबला भेट दिली. तत्पूर्वी रविवारी पाटणा येथे मोदींनी निवडणूक प्रचारार्थ रोड शो देखील केला आहे.
नरेंद्र मोदी आज हाजीपूर येथील जनसभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे, आज सकाळीच त्यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी, लंगरसेवाही दिली.
मोदींनी येथे लंगरसेवा देताना स्वत:च्या हाताने चपाती लाटल्याचं दिसून आले, विशेष म्हणजे अगदी गोल चपाती त्यांनी लाटली होती, तर भोजनगृहात भेट देऊन लंगरभोजन करणाऱ्या भाविकांना स्वत:च्या हाताने जेवण वाढले.
मोदींनी येथील दौऱ्या गुरुमहाराज यांच्या लहानपणीच्या अस्त्र, शस्त्रांचे प्रदर्शनही पाहिले. यावेळी, मोदींना गुरुघरचा अशीष सिरोपही देण्यात आलाय.
शिख बांधवांचे दुसरे सर्वात मोठे तख्त श्री गुरु गोविंद सिंहजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या श्री हरिमंदिरजी पाटणा साहिब येथे मोदींनी भेट दिली.
गुरुद्वारा कमिटीच्यावीने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. तर, मोदींच्या येण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी परिसराचा आढावाही घेतला होता.