काय त्यांची चाल, काय तो रुबाब; सारंखेड्यात अश्वसौंदर्य स्पर्धा, अश्वशौकीनांची गर्दी
सारंखेडा चेतक फेस्टिवलमध्ये अश्वसौंदर्य स्पर्धा संपन्न झाली असून तीनशे पेक्षा अधिक घोड्यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण अनेक सौंदर्य स्पर्धा संदर्भात ऐकलं असेल मात्र चेतक फेस्टिवलमध्ये होणारी आश्वासौंदर्य स्पर्धा ही अश्वशोकीनांसाठी पर्वणी असते.
देखण्या आणि रुबाबदार एकाहून एक सरस घोडे या स्पर्धेत सहभागी होत असतात आणि या स्पर्धेत विजयी अश्वांना भविष्यात लाखो आणि कोट्यावधीच्या बोली लागत असतात.
एखाद्या सौंदर्य स्पर्धेसाठी जे मापदंड असतात तेच अश्वसौंदर्य स्पर्धेसाठी असतात.
अश्वसौंदर्य स्पर्धेत घोड्याची चाल, त्याची शरीराची ठेवण, उंची रुबाबदारपणा यासह त्यातील सर्वच गुणांचं मूल्यमापन करून चेतक फेस्टिवलमध्ये सर्वात सुंदर घोडा आणि घोडीची निवड केली जाते.
या स्पर्धेसाठी देशभरातून अश्व मालक आपले घोडे घेऊन आलेले असतात आणि याच स्पर्धेत प्रथम द्वितीय, तृतीय आलेल्या घोड्यांवर मोठ्या बोली लावली जाते.
देशाच्या कानाकोपऱ्यातून या आश्वासौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी अश्वप्रेमी येत असतात.
देशात पहिल्यांदाच सारंगखेडा येथे डे नाईट स्पर्धा होत असल्यानं अशोप्रेमींसाठी ही मोठी उत्साहाची बाब ठरत आहे.
सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 1700 घोडे दाखल झाले आहेत, त्यांना पाहण्यासाठी अश्वशौकीनांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सारंगखेड्याच्या बाजारात लाखमोलाचे घोडे दाखल झाले आहेत.
मुंबईतल्या एका अलिशान फ्लॅट एवढी सारंगखेड्याच्या बाजारात दाखल झालेल्या एका घोड्याची किंमत आहे.
18 डिसेंबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा संपन्न झाली आहे.