Photo: सत्तेत सोबत, तरीही भाजपकडून शिंदे गटाच्या विरोधात आंदोलन
शिंदे गट आणि भाजप (BJP) राज्यात सत्तेत एकत्र असतानाही पहिल्यांदाच हे दोन्ही पक्ष जाहीरपणे आमने-सामने आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिल्लोड नगर परिषदेच्या करवाढ विरोधात आज 6 जानेवारी रोजी भाजपच्या वतीने डफडे वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे.
दुपारी 12 वाजेच्या सुमरास आंदोलनाला सुरवात झाली.
सिल्लोड नगरपरिषदेवर हे आंदोलन जाऊन धडकले.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची तीस वर्षांपासून एक हाती सत्ता असणाऱ्या नगर परिषदेच्या विरोधात भाजपने हे आंदोलन केले आहे.
करवाढीचा मुद्दा घेऊन भाजपने हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वी शहरातील मालमत्ता करवाढीचा वाढ नियमबाह्य पद्धतीने आकारल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात येत आहे.
या करवाढीला तीव्र विरोध करण्यासाठीच आज भाजपकडून आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती भाजप पदाधिकारी यांनी दिली आहे.