PHOTO : मोहाची दारु आणि धान्यांचा नैवेद्य, सातपुड्याच्या डोंगरमाथ्यावरील आदिवासी बांधव करतात वाघाची पूजा
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटात असलेल्या नणंद भावजाईच्या घाटात चक्क वाघाची पूजा केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाघाने गाव-शिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करु नये, गावपाड्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासी बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे.
मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरी आज ही त्यांची पूजा केली जाते
आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून समाजाच्या चालीरितीमध्ये वन्यप्राणी आणि निसर्गाचं महत्वाचे स्थान आहे.
जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात वाघदेव मंदिर असून दरवर्षी दोन दिवसीय वाघदेव यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होते.
या यात्रोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.
माघ महिन्यात महाशिवरात्रीपूर्वी वाघदेवतेचे पूजन केले जाते.
वाघ देवतेचे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहामोगी देवीच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातील देवमोगरा येथे रवाना होतात.
वाघ देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि मोहाच्या फुलाच्या दारुचा नैवेद्य दाखवला जातो.
हा नैवेद्य दाखवल्यानंतर ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ होत असून पूजन करुन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधवांचे सुरु आहे.