Nandurbar News: गुलाबी थंडीत नंदुरबारमध्ये रंगला भजी महोत्सव; वेगवेगळ्या तीस प्रकारच्या भजीवर खवय्यांनी मारला ताव
गुलाबी थंडी, वाफाळता चहा आणि त्यासोबत चविष्ट आणि खमंग भजी… वाह क्या बात है... खवय्यांना हा अनुभव नंदुरबारमध्ये मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण नंदुरबारमध्ये पहिल्यांदाच भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील हुतात्मा शिरीष कुमार गार्डनमध्ये भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबारकरांनी या महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला.
महोत्सवात एकूण 30 प्रकारच्या भजी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
गुलाबी थंडीत नंदुरबारकरांनी गरमागरम भजीचा आस्वाद घेतला.
विशेष म्हणजे साठ रुपयात पोट भरून भजीचा आस्वाद घेतला.
नंदुरबारकरांना पहिल्यांदाच अशा प्रकारे खाद्यपदार्थांचा महोत्सव आयोजित झाल्याने नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला.
बटाटा भजी, कांदा भजी, वांग्याची भजी, टोमॅटो भजी, मिरची भजी, पालक भजी, मूगडाळ भजी, घोसाळ्याची भदी, कॉर्न भजी, मिक्स व्हेज भजी, पनीर भजी, मिरजी भजी अशा विविध प्रकराच्या भजी होत्या.
अनिल शर्मा हे भजी महोत्सवाचे आयोजन केले होते.
खवय्यांसाठी गाण्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. आज महोत्सवाचा शेवटचा आहे.