अवकाळी पावसामुळं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीला मोठा फटका
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबार जिल्ह्यातील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची वाळवण्यासाठी पथरींवर टाकली जात असते. मात्र, गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामध्ये 15 हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची खराब होण्याची भीती
व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करुन भरपाई त्यांना द्यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा मिरची व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची पथारींवर वाढण्यासाठी टाकत असतात.
गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अवकाळी पावसामुळं मिरची ओली होऊन काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मिरची खराबही होत आहे.
सरकारनं मिरची व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पथारीवर टाकलेल्या मिरचीसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी नंदुरबार जिल्हा मिरची व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी कोठारी यांनी केली आहे.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.