Farhan Akhtar : बॉलिवूडचा ऑलराऊंडर अभिनेता फरहान अख्तरने 'अशी' घेतली फिल्मी दुनियेत एन्ट्री; वाचा त्याचा जीवनप्रवास
बॉॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने वयाच्या 17 व्या वर्षी कोणाच्याही मदतीशिवाय सहाय्यक दिग्दर्शक झाला. यानंतर त्याने रितेश सिधवानीबरोबर प्रोडक्शन हाऊस 'एक्सेल एंटरटेनमेंट' या नावाने सुरु केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिग्दर्शक असो, अभिनेता, निर्माता किंवा पटकथा लेखक फरहानने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी मुंबईत झाला. त्यानंतर जी. कूपर स्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि त्यानंतर मुंबईच्या एच.आर. कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.
फरहान अख्तरने 1991 मध्ये 'लम्हे' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि 1997 मध्ये 'हिमालय पुत्र' या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम करून हळूहळू आपल्या करिअरची सुरुवात केली.
'दिल चाहता है' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाने फरहानला एक वेगळी ओळख मिळवून दिली आणि हाच त्याच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर फरहानने 1986 मध्ये अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'डॉन'चा रिमेक बनवला आणि तो चित्रपटही हिट झाला.
फरहानने 2008 मध्ये 'रॉक ऑन' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फरहानला 'रॉक ऑन' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
फरहानने 2011 मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनयही केला होता. फरहानचा हा चित्रपट चाहत्यांना फार आवडला आणि अर्थात हाही चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी फरहानला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. त्याच वर्षी, त्याने 'डॉन 2' चे दिग्दर्शन केले.
फरहान 2002 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' आणि 2005 मध्ये 'नच बलिए' या टेलिव्हिजन शोमध्ये जज म्हणून देखील दिसला. त्याचबरोबर त्याने NDTV इमॅजिनवर एक टेलिव्हिजन शो देखील होस्ट केला.