Sahastrakund Waterfall : नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित; नागरिकांची मोठी गर्दी, पाहा फोटो
दरम्यान मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा देखील कोसळताना पाहायला मिळत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याचा प्रवाह सुरु झाल्याने हे पाहण्यासाठी नांदेडकर गर्दी करण्याची शक्यता आहे.
पावसाने दांडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाह सुरु झाला नव्हता. त्यामुळे पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली होती.
दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांत नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे.
विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगरपासून 15 किमी अंतरावर पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बाणगंगा धबधबा शनिवारी दुपारपासून खळखळला आहे.
मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात धबधबा सुरू झाला होता. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्याने पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
सध्या अंदाजे 100 ते 150 फुटावरून सहस्त्रकुंड धबधबा कोसळत असून, सहस्त्रकुंड धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या व्यंगमदृश्याचा आनंद पर्यटक 80 फुट उंचीच्या मनोऱ्यावरून घेत आहेत. तर धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर असल्याने दर्शनासाठी ही भावीक येतात.