Nanded : ओसंडून वाहणारा शेख फरीदबाबा धबधबा पर्यटकांना खुणावतोय, पाहा फोटो
नांदेडच्या माहूर शहरापासून 12 किलोमिटर अंतरावर असलेला शेख फरीद वझरा धबधबा ओसंडून वाहत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोरदार पाऊस झाल्यावर दरवर्षी हा धबधबा ओसंडून वाहत असतो, त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.
डोंगरदऱ्यात असल्याने आणि आजुबाजुला निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटकांसाठी हा धबधबा पर्यटनस्थळ बनले आहे.
तर सततच्या पावसाने तीर्थक्षेत्र माहूर इथल्या वनराईने हिरवागार शालू परिधान केलाय. त्यात माहूर शहराजवळच्या शेख फरीद दर्गाह इथला धबधबा मोठ्या वेगाने प्रवाहित झालाय.
डोंगर दऱ्यातील पर्वतरांगांच्या कुशीतून नैसर्गिकरित्या हा धबधबा निर्माण झालेला आहे.
शंभर फुटाच्या उंच दरीतून कोसळणारा हा धबधबा नयनरम्य असाच आहे.
उंच डोंगरावरून कोसळणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी इथे स्थानिकांनी गर्दी करतांना पाहायला मिळत आहे.
अत्यंत दुर्गम भागात असलेला या धबधब्याच्या जागी सुविधा निर्माण केल्यास पावसाळी पर्यटनाचे हे एक चांगले ठिकाण होऊ शकते, मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय.
विशेष म्हणजे आई रेणुका मातेच्या मंदिरापासून हा धबधबा अवघ्या आठ किलोमिटर अंतरावर असल्याने भाविक या ठिकाणी गर्दी करतांना दिसतायत.