Nanded: गौराईला केळीच्या बागेचा देखावा ठरलाय आकर्षक; नांदेमधील कुटुंबियांकडून अनोखी सजावट, पाहा फोटो
पार्डी गावातील दिगंबर भांगे पाटील यांच्या कुटुंबाने सजीव देखावा तयार केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळत पाना-फुलांनी केलेल्या देखाव्याची गावात एकच चर्चा आहे.
पाटील कुटुंबाने गौराईचा साजश्रृंगार देखील केला आहे.
केळीच्या बागेत गौराई विराजमान झाल्यासारखं हे दृश्य गावात आकर्षणाचा विषय बनलंय.
हा देखावा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.
गौराईच्या मध्ये विठु रखुमाईची आकर्षक मुर्ती देखील ठेवण्यात आली आहे.
साजशृंगार करून पाटील कुटुंबाने गौराईची स्थापना केली.
दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करुन देवीला पंचपक्वान्न तयार करण्यात आलं. केळीच्या पानावर सर्व पदार्थ ठेवण्यात आले होते.
नैवेद्याच्या पंचपक्वानात मोदक, पुरणपोळी, अळुची भाजी, उडीद-मुगाचे वडे, कोशिंबीर, चटण्या, खीर, भजी, कढी, आंबील, पंचामृत, कटाची आमटी, लोणचे, लाडू, करंज्या, कुरडया, भात-वरण अशा विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवला गेला.
यासोबत दिव्यांची आरास देखील करण्यात आली होती.
गौराईंना घातलेला हा हिरवा गालिचा खरंच मन प्रसन्न करुन टाकणारा होता.
एन्ट्रीच्या वेळीही केळीच्या पानांनी बनवलेली कमान लावण्यात आली होती.
महालक्ष्मी देवीची पूजा करुन गौराई पूजनाचा संपूर्ण विधी पार पडला.