Photo: नांदेडच्या आदिवासी पाड्यावरील नागूबाई जेव्हा तिरंगा फडकवितात
Nanded News: तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर सुद्धा घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यात आलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले होते.
अवघ्या 15 उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
यावेळी गावातील जेष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम ही महिला गावातील इतर महिला समवेत आपल्या दाराला तिरंगा लावण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले होते.
सडे आणि रांगोळीने सजलेल्या खांबाला त्यांनी तिरंगा लावल्याने देश प्रेमाची एक नवी ऊर्जा त्यांच्यात पाहायला मिळत होती.
गावातून, विविध पाडयामधून विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून अवघा परिसर देशभक्तीमय केला होता.