Nanded News: निजामाच्या जोखडातून मुक्तीस 75 वर्षे पूर्ण; आजही उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती देतायत स्वातंत्र्य लढ्याची साक्ष
येथील हैद्राबाद स्टेट बँक, पोलीस स्टेशनवरील हल्ला, रेल्वे रूळ उखडून टाकणे याला 30 जानेवारी रोजी बरोबर 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिजामाच्या पोलीसाची ज्या पोलीस चौकीवर हल्ला झाला ती इमारत आज त्या काळातील हैद्राबाद मुक्तीच्या आठवणी आपल्या प्रत्येक शिळेवर घेऊन उभी आहे.
उमरी पोलीस स्टेशन आज ज्या वास्तुत आहे. त्या वास्तुचा ऐतिहासिक संदर्भ लाखमोलाचा आहे.
या उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती त्या काळातील तिजोरीसह मुक्तीच्या या लढ्याला पुढच्या पिढीसाठी वाहते करण्यास सज्ज आहेत.
पोलीस विभागाने हे पोलीस स्टेशन आहे त्या स्थितीत आजवर व्यवस्थीत जपले आहे.
ऐतिहासिक साक्षीसह उमरीतील शांतता व सुव्यवस्थेसाठी येथून कामकाज पाहिले जाते.
30 जानेवारी 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी हा हल्ला आणि बँकेची लूट करण्यात आली.
यावेळी नागनाथ परांजपे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांच्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ल्यासाठी धाव घेतली.