Ayodhya Ram Mandir: पवित्र शिलेत घडवली जाणार प्रभू श्रीरामाची मूर्ती; नेपाळहून रवाना केलेले शाळीग्राम उत्तर प्रदेशात दाखल होणार
अयोध्येमध्ये (Ayodhya) भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) काम प्रगती पथावर आहे. 2024 पर्यंत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराम मंदिरांच्या गर्भगृहामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. प्रभू श्रीराम आणि सीता मातेची मूर्ती कोणत्या शिलेत घडवायची हा प्रश्न होता.
पण, आता राम आणि सीतेच्या पवित्रा मूर्तीसाठीच्या शिलेचा शोध पूर्ण झाला आहे. या कामासाठी एक पथक गेल्या अनेक महिन्यांपासून शोधकार्यात गुंतलं होते.
हिंदू धर्मात अनेक दगड शुभ मानले जातात. भगवान राम आणि माता सीता यांच्या मूर्तीसाठी कोणता दगड योग्य असेल, हे ठरवण्याचा आणि दगडाचा शोध सुरू झाला.
आता अखेरीस यावर शिक्तामोर्तब झाला आहे. राम जन्मभूमि मंदिर निर्माण समितीने दिलेल्या माहितीनुसार, प्रभू श्रीराम आणि सीता मातेची मूर्ती पवित्र शाळीग्रामापासून बनवली जाणार आहे.
हे शाळीग्राम सुमारे सात फूट लांब आणि पाच फूट रुंद आहेत. या दगडांवर कोरीव काम करून प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती घडवली जाणार आहे.
दरम्यान, आता प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी 600 वर्ष जुने शाळीग्राम सापडले आहेत. हे शाळीग्राम एक लाख वर्ष जुने असल्याचं सांगितलं जातं आहे.
राम मंदिराच्या गर्भगृहात राम-सीतेची मूर्तीसाठी शालिग्राम नेपाळमधून अयोध्येत आणला जात आहे.
हे दोन्ही शाळीग्राम दगड दोन ट्रकवर सोमवारी नेपाळहून अयोध्येकडे रवाना झाले आहेत. आज 31 जानेवारी 2023 रोजी हे शाळीग्राम नेपाळहून भारताच्या बिहारमार्गे गोपालगंज मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करतील.
1 फेब्रुवारीला सकाळी विधीपूर्वक यात्रेची पूजा करून शाळीग्राम गोरखपूरहून अयोध्येकडे रवाना केले जातील.
नेपाळमध्ये काली गंडकी नावाची नदी आहे. मूर्तीसाठी या नदीतून दोन मोठे शाळीग्राम खडक बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्हींचे वजन 26 आणि 14 टन आहे.