Photo: जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या प्रचाराचे धडे
नांदेडच्या भोकर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या प्रचाराचे धडे दिले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभ्यासक्रम बाजूला सारून बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूच्या (Asaram Bapu) कार्य कृतत्वाचे धडे आणि मंत्रोच्चार शिकवण्यात येत आहे.
पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, कारवाईची मागणी केली जात आहे.
भोकर तालुक्यातील नागापूर, डोर, सायाळ, रेणापूर, नांदा, सोनारी, हासापूर, रायखोड या बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळेत आसाराम बापूच्या कृतत्वाचे धडे दिले जात असल्याचे समोर आले आहे.
हा सर्व प्रकार समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये आसाराम आरोपी बापूंचे कार्यक्रम घेतल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिक्षक संस्काराच्या गोंडस नावाखाली चक्क आसाराम बापूचे धडे देत आहे.
आसारामच्या भक्तमंडळीच्या नादी लागून जिल्हा परिषदेच्या शाळेत मंत्रोच्चारासह महिलांचे हळदी कुंकवाचे भलतेच कार्यक्रम करीत असल्याचे समोर आले आहे.