Nanded News: 'गुलाब' बनला नांदेडच्या तीन हजार कुटुंबांचा आधार
प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी गुलाबाच्या (Rose) फुलांची निवड करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच गुलाबाच्या खरेदी-विक्रीतून नांदेडच्या (Nanded) बाजारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
प्रेमाची उलगड करणारा हाच गुलाब जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कुटुंबांच्या रोजीरोटीचा आधारही बनलाय.
नांदेड शहरातील हिंगोली गेट भागात दररोज सकाळी फुलांचे मार्केट भरताना पाहायला मिळते.
सकाळी 6 वाजल्यापासून या भागात गुलाब, जास्वंद, मोगरा, अशा विविध फुलांचा सुगंध दरवळतो.
या बाजारपेठेत मोठया फुलांची आवक होऊन या फुलांबरोबरच गुलाबाची खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होते.
विशेष म्हणजे इतर फुलांच्या तुलनेत गुलाबांची खरेदी-विक्री जोरात असते.
दररोज जवळपास 20 क्विंटल गुलाबांची या बाजारपेठेत विक्री होते.
सरासरी 150 ते 200 रुपये किलो भाव मिळतो, ज्यातून दिवसभरात 4 लाखांची उलाढाल होते.
या बाजारपेठेत 12 होलसेल व्यापारी असून, 100 ते 150 किरकोळ व्यापारी आहेत.
यातून फुलशेती करणारे शेतकरी, व्यापारी, फुल विक्री, खरेदी बुके, हार तयार करणारे कारागीर अशा तीन हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो.