Photo : महाराष्ट्रातील दुसरे शक्तिपीठ; माहूरगडाच्या रेणुकामातेचे माहात्म्य...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक असणारे शक्तीपीठ म्हणून माहूरचे श्री रेणुकादेवी (Renukadevi) मंदिर ओळखले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगात रेणुकादेवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे.
देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले.
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुकदेवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो तर नवरात्रीच्या नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय
श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे
रेणुकादेवीचे हे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे, असे म्हटले जाते.
माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.