Renuka Devi : माहूर गडावर श्रीपंचमीच्या निमित्ताने रेणुका मातेला द्राक्षांची आरास
साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ अशी नांदेमधील माहूर गडावरील रेणुका मातेची ओळख आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाहूर गडावर आज श्रीपंचमीच्या निमित्ताने रेणुका मातेला द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.
ही आरास करण्यासाठी तब्बल पाच क्विंटल द्राक्षे आणि आंब्यांचा वापर करण्यात आला आहे.
रेणुका मातेच्या गाभाऱ्यात उभारलेल्या या नयनरम्य देखावा पाहण्यासाठी तसंच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे.
श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते.
माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले अशी आख्यायिका आहे.
देवीचा मुखवटा तब्बल 5 फुटी उंच आहे आणि रुंदी 4 फुटी इतकी आहे.
जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे. देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे.