Maha Pashudhan Expo 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही 12 कोटींचा रेडा पाहण्याचा मोह!
साईंच्या शिर्डी नगरीत देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा समारोप रविवारी (26 मार्च) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एक्स्पोमध्ये आलेल्या हरियाणा राज्यातील 12 कोटींच्या रेड्याला पाहण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना सुद्धा आवरला नाही.
भाषण संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेडा पाहण्यास पसंती दिली.
हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचा विशेष आकर्षक ठरला.
साधारण बारा कोटी रुपये किंमत असलेल्या या रेड्यापासून जन्मलेल्या म्हैस पंचवीस लीटर दूध देतात.
इंदर नावाचा हा काळा कुळकुळीत रंग, लांब आणि भक्कम शरीर बांधा असा दिसणारा हा रुबाबदार रेडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली.
या रेड्याच्या सीमेनमधून वर्षाला 75 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती रेड्याचे मालक गुरसेन सिंह यांनी दिली.
शिर्डीतील या देशातील सर्वात मोठ्या तीन दिवसीय पशुधन एक्स्पोला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळला.