Nanded: माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती; नांदेडच्या शिक्षकाचा यशस्वी प्रयोग, पाहा फोटो

कंधार येथील शेतकरी ग्यानोबा गंगाधर मजरे यांची वडिलोपार्जित सात एकर शेती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यापैकी एक एकर जमिनीवर त्यांनी गेल्या वर्षी 10 जून रोजी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती. यावर्षी या बागेला फळ लागायला सुरुवात झाली आहे.

ग्यानोबा मजरे हे कोठारी (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे प्राथमिक शिक्षक असून, त्यांनी हा प्रयोग आपल्या शेतात केला आहे.
या फळात रॉयल रेड याचा आकार लहान असून, हे फळ अत्यंत गोड आहे. दुसरी जम्बो रेड व्हरायटी असून, या फळाचा आकार मोठा आहे.
मजरे यांनी आपल्या शेतात 11 बाय 6 फुटाचे याप्रमाणे एक एकरात 525 सिमेंट पोल रिंग या पद्धतीने 2100 रोप लावले आहेत.
यासाठी ठिबक सिंचन त्यांनी केले आहे. त्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे.
सध्या बाजार भावाप्रमाणे हे फळ विकले तर उत्पन्न हे 2 लाख येणार असल्याचे ग्यानबा मजरे यांनी सांगितले.
सध्या बाजारात हे फळ 200 रुपय किलोने विकल्या जाते, तर ग्यानबा मजरे यांनी हे फळ थेट नागरिकांकडे जाऊन विकणार असल्याचे सांगितले.