Rain: हवामान विभागानं वर्तवला मान्सूनच्या परतीचा अंदाज
पाच किंवा आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिलीआहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात दुष्काळाची (Drought) चाहूल लागली आहे. कारण बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत.
पावसाची गरज असतानाच परतीच्या हवामान खात्यानं मॉन्सूनच्या परतीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण विभाग वगळता अन्य सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही.
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे.
सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.